महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त मुळा मुठा नदी स्वच्छता व प्लास्टिक मुक्ती अभियान राबविले.

ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजने च्या वतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त मुळा मुठा नदी स्वच्छता व प्लास्टिक मुक्ती अभियान राबविण्यात आले.
ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एकूण 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन येरवडा येथील नदी पात्रामध्ये श्रमदान केले.
संपूर्ण पुणे शहरामध्ये सर्व महाविद्यालयाच्या एकूण 10000 विद्यार्थ्यांनी श्रमदान केले.समारोप समारंभ पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्तीथी मध्ये शनिवार वाडा येथे संपन्न झाला..