ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीतर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन

ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही अनंत चतुर्दशीच्यानिमित्ताने समाजाला विविध सामाजिक विषयांवर संदेश व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ढोले पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमधील सर्व शाखांमधल्या जवळपास ६०० विद्यार्थी व प्राध्यापक वृंदाने सहभाग नोंदविला होता. या रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर आपले सादरीकरण करून जनजागृती केली. या प्रसंगी ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री सागर उल्हासराव ढोले पाटील, सेक्रेटरी सौ. उमा सागर ढोले पाटील, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ निहार वाळींबे यांच्यासह सर्व विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
सार्वजनिक उत्सवात तरुणाईसह प्रत्येक स्तरातील व्यक्ती सहभागी होऊन जल्लोष साजरा करतो. त्यामुळे या सार्वजनिक उत्सवात सहभागी झालेल्या प्रत्येकाला काहीतरी सामाजिक संदेश द्यावा व विद्यार्थ्यांना समाजमूल्यांची जाण व्हावी आणि विद्यार्थ्यांकडून सर्वत्र चांगला सामाजिक संदेश जावा. असा ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन यांचा मानस होता. त्यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या सामाजिक विषयांवरील जनजागृती रॅली सर्वत्र आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय एकात्मता, महाराष्ट्राची लोकधारा, आपत्ती व्यवस्थापन जनजागृती, वृक्ष दिंडी, स्वच्छ भारत,वारकरी दिंडी आदी विषयांवर जनजागृती करणारे संदेश व पाठ संचालन करण्यात आले. महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार या रॅलीच्या माध्यमातून होतो. विद्यार्थ्यांच्या या रॅलीतून संस्कृतिकतेने सामाजिक संदेश जनसामान्यांना देण्यात येतो. विद्यार्थ्यांच्या नेटक्या पोशाखात, शिस्तबद्धतेने व सुसूत्रतेने निघालेल्या बाप्पाच्या मिरवणुकीने सर्व जनसामान्यांचे लक्ष वेधून घेतले. यात विशेष आकर्षण म्हणजे बाप्पाच्या मार्गावर विद्यार्थी व विद्यार्थिनिंनी आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर भाष्य केले. जनसामान्य विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट सूत्रबद्ध संचालनालयाकडे आकर्षिले जात होते. बाप्पाला दिल्या जाणाऱ्या निरोपासह समाजालाही आपण काही देणं लागतो. याची विद्यार्थ्यांसह सर्व सामान्य जनतेलाही जाण असावी असा प्रांजळ उद्देश रॅलीच्या आयोजनामागे आहे.