ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यामध्ये आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा पार पडली .
ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत, पुणे जिल्हा क्रिडा विभाग आणी ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा पार पडली . यामध्ये एकूण ३८ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शारिरीक शिक्षण बीएसओ मेंबर डॉ. रमेश गायकवाड व पुणे जिल्हा क्रिडा विभाग सचिव डॉ. सुहास बहिरट, प्राचार्य डॉ निहार वाळींबे यांच्यासह सर्व विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
या स्पर्धेत अंतिम सामना इंदिरा कॉलेज,ताथवडे विरुद्ध टी. सी. बारामती यांच्या मध्ये रंगला. या रंगतदार सामन्याची सांगता टी. सी. बारामती महाविद्यालयाच्या विजयाने झाली.