गणेशोत्सवादरम्यान विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजीत विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा
ढोले पाटील शिक्षण संस्थेचे चेअरमन सागर उल्हासराव ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे यावर्षीही ढोले पाटील महाविद्यालयामध्ये गणेशोत्सव उत्साहपूर्वक वेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला.
गणेशोत्सवादरम्यान विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये
१) ढोले पाटील कॉलेज गणपती मंडळ
टेक्निकल आणि कॅल्चरल स्पर्धा
२) गौरी गणपती सजावट स्पर्धा
३) जनजागृती अभियान-गणपती विसर्जन रॅली ढोले पाटील रोड, पुणे
आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सादर स्पर्धांमधील विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरणाचा सोहळा नुकताच दि २५/०९/२०१९ रोजी संपन्न झाला. सादर कार्यक्रमासाठी संस्थेच्या सेक्रेटरी सौ. उमा सागर ढोले पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निहार वाळिंबे व ढोले पाटील स्कुल फॉर एक्सलन्सच्या प्राचार्या डॉ. अनुराधा अय्यर यांनी विद्यार्थ्यांना आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.