इंडियन रेड क्रॉस सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक उपक्रमा मध्ये ढोलेपाटील अभियांत्रिकी महाविद्यालयचा सहभाग

इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि युथ रेड क्रॉस या जागतिक एन. जी ओ पुणे जिल्हा युनिट च्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकी दरम्यान लक्ष्मी रोड येथे दि. 12सप्टेंबर 2019 रोजी प्राथमिक उपचार मदत केंद्र आणि मोफत पाणी सुविधा तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा पूरग्रस्त साठी निधी संकलन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ढोलेपाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा संघाच्या विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमा मध्ये सहभाग घेऊन काम केले…
यानिमित्त पुणे शहराच्या महापौर सौ. मुक्ता टिळक यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमा बद्दल कौतुक केले…
त्याच बरोबर संस्थेचे चेअरमन मा.सागर ढोले पाटील, सेक्रेटरी मा.उमा सागर ढोले पाटील व प्राचार्य डॉ. निहार वाळिंबे यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.